आमच्या प्रेमच्या गणितात बाकी आमच्याकडेच निघते; कारण आम्ही हिशोब कधी ठेवला नाही.(हाही आमचाच अडाणीपणा). आमच्यावर आरोप होतो की आम्ही फक्त घेत गेलो, दि काहिच नाही...मग जागवलेल्या त्या धुद रात्री कोणाच्या होत्या? कुणासाठी होत्या? छे असा प्रश्न विचारनच चुकीचे....कारण ती तर फक्त आमचीच भुख...सगळ काही फक्त आमच्यासाठीच होतं.....कदाचीत असही कोणी म्हणू शकेल की आम्ही आमच्या जोडीदाराचा वापर करत होतो...वापर...की आमचाच वापर झाला....पण मला ते कसं कळेल...मी त्या प्रवाहात वाहत गेलो...कीती ते विचारु नका....कारण आम्ही त्याची मोजदाद केली नाही.....
पुढे सगळच बदललं......आयुष्य, ध्येय , वाटचाल...सगळ काही....
मग तुम्ही म्हणाल तुमची जोडदार कुठे गेली?...ती गेलीच नाही कुठे..ती इथेच आहे माझ्या मनात...फक्त शरीराने दुर.... पण तीने मला दुर केलं....कसं? अहो कसं काय म्हणता? प्रेमातला दुसरा विषय विसरलात?.... अहो भुमिती....या विषयात लहान मोठ्या अंशाचे कोन असतात..... त्रिकोण असतात .....कधि कधि चौकोन असतात....आमच्या आयुष्यात कोणता कोन आला ते विचारु नका...छे हि भुमिती फारच अवघड..मला तर काही कळत नाही यातल...पण एक सांगतो; तुमच्या आयुष्याचा कोणताही कोन होऊ देत पण काटकोन त्रिकोण होऊ देउ नका..कारण या भुमितीत पायथागोरस काही कामाचा नाही.
हे गणित आणि भुमिती सोडवणं आम्हाला काही जमलं नाही. म्हणुन आम्ही अडाणी ते illitrate का काय ते....खर तर या प्रेमाच्या प्रवाहात फक्त वाहत गेलो......कधितरी किनारा सापडेल म्हणुन लाटांचे फटके हसत सहन करत गेलो....उगवत्या नारायणाला नमस्कार तर मावळत्या दिवसाला धन्यवाद म्हणत गेलो....रात्रीच्या चंद्राला तीच्या गुजगोष्टी सांगत राहीलो...ती सुखी आहे अस म्हणत मीही हसत राहीलो....आज कळल प्रेमाच्या विषयात मी अडाणीच राहीलो..
हे परमेश्वरा; तिचे आयुष्य सुंदर फुलांनी उमलु देत.....तिच्या वाटेवरती प्राजक्ताचे सडे पडू देत.....तिचे सगळे दुःख मला दे माझे सारे सुख तिला दे.......
हे सखे;
माझे हे आयुष्य तु सोडवलेल्या गणिताला .....तु जोडलेल्या त्या भुमितीला अर्पण .....
तु सुखी रहा मी सुखी आहेच!
No comments:
Post a Comment