Thursday, February 14, 2019

बिन प्रेताची अंत्ययात्रा...

आठवणींच्या सावलीत सजवलेली तिरडी
आप्तस्वकीयांच्या खांद्याचा भार होऊन
अखेरची शोभायात्रा निघाली...
एका कोपऱ्यात बसून मी ही अनुभवली
बिन देहाची अंत्ययात्रा...
निजलेल्या जाणिवांचा जागर होताना पाहिला
नसलेल्या प्रेमाचा सागर होताना पाहीला
रडणाऱ्यांचे खोटे अश्रू बघून आत्मा ही जळतांना पाहीला
बिन देहाच्या या अंत्ययात्रेत अहंकार विकतांना पाहिला
सरतेशेवटी चीते वरती पुतळा जळताना पाहीला...
बिन देहाच्या या अंत्ययात्रेला आत्मा दुःखी होताना पाहीला

©अल्केश अहिरे 🦂

Thursday, January 24, 2019

संवाद – माझ्यातला मी आणि तुझ्यातला मी


संवाद आणि संभाषण यात फरक नक्कीच असतो. मला संभाषण नाही करायचं, संवाद साधायचा आहे, माझ्यातल्या मीचा तुझ्यातला मी शी.

काय आहे ना आपल्यात होणाऱ्या संभषणामूळे आपल्यातला संवाद हरवत चालला आहे.

आता माझ्यातल्या मी कोण? तर हा माझ्यातला मी म्हणजे 'मी जसा आहे तसा', जो अव्यक्त आहे, दुसऱ्याच्या शरिरातील आत्मा असल्या सारखा वावरणारा, स्वत:च अस्तित्व हरवुन बसलेला. आणि तुझ्यातला मी कोण? तर ह्या माझ्यातल्या मी चा थांगपत्ताही माहीत नसलेला, जगाला दिसतो म्हणून अस्तित्व असलेला, अपेक्षांचं ओझं वाहणारा, आणि श्र्वास चालू आहे म्हणून जगणारा.

बराच गोंधळ उडाला असेल नाही? पण काय आहे ना, असे बरेच “मी” आपल्या भोवती असतात, तुझ्यातल्या मीला ते जाणवतही नसतील.

तर मला आज संवाद साधायचा आहे तुझ्याशी, तुझ्यातल्या मी शी. सांगून टाकायचे आहे की नाही जमणार हे द्वंद्व, थकलोय आणि हरलोय हा मुखवटा घालून. आता जगायचंय जसा आहे तसंच. तु म्हणशील म्हणजे नक्की काय करायचंय? सांगतो ऐक

काल एक वाक्य ऐकलं… “This generations living only engineered and technical relationship. They don’t think beyond physical needs, either bodily or materialistic. They forgot emotional needs of relationship. In fact, they diverted their emotions towards physical needs and bonded it tightly so there is no escape”

कळलं? ही आजची पिढी फक्त व्याव्हारिक संबंधांवर जगतेय. त्यात भावनांना जागाच नाही. माझी इथेच घुसमट होते आहे म्हणून माझ्यातल्या अव्यक्त मी आज व्यक्त होतोय. तुझ्यातल्या मी कडून अश्याच होणाऱ्या अपेक्षा मला जिवंतपणी मरण यातना देतात. तुझ्यातल्या मी च्या दार्शनिक सुखासाठी माझ्यातल्या मी अनेकदा दुखावलेला असतो हे तुझ्या लक्षात येतही नाही.

खरं तर चुक तुझी ही नाही. स्वत:ला काय हवं हे समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याला देण्याची घाई केली की हे असं होतं.

संवाद सुरू केलायपुन्हा येईलकारण तुझ्यातल्या मी शी युती करून माझ्यातल्या मी ला आयुष्याचं हे राज्य सुखाने चालवायचं आहे.


तुझ्यातल्या मी माझ्यातल्या मी
फक्त तुझाच मी

Thursday, December 13, 2018

My Life: View, Review & Revisit

View➥

My Life..... Never left a chance to teach me or torture me at each step of life. Struggle is what I say another word for my life. But is it I am alone facing this problem? answer is "NO". Each one of us face this at some-level, but now I am fade up with this. I always ask GOD why me? 

Thursday, September 28, 2017

माझे चुकलेले गणित


आमच्या प्रेमच्या गणितात बाकी आमच्याकडेच निघते; कारण आम्ही हिशोब कधी ठेवला नाही.(हाही आमचाच अडाणीपणा). आमच्यावर आरोप होतो की आम्ही फक्त घेत गेलो, दि काहिच नाही...मग जागवलेल्या त्या धुद रात्री कोणाच्या होत्या? कुणासाठी होत्या? छे असा प्रश्न विचारनच चुकीचे....कारण ती तर फक्त आमचीच भुख...सगळ काही फक्त आमच्यासाठीच होतं.....कदाचीत असही कोणी म्हणू शकेल की आम्ही आमच्या जोडीदाराचा वापर करत होतो...वापर...की आमचाच वापर झाला....पण मला ते कसं कळेल...मी त्या प्रवाहात वाहत गेलो...कीती ते विचारु नका....कारण आम्ही त्याची मोजदाद केली नाही.....
पुढे सगळच बदललं......आयुष्य, ध्येय , वाटचाल...सगळ काही....
मग तुम्ही म्हणाल तुमची जोडदार कुठे गेली?...ती गेलीच नाही कुठे..ती इथेच आहे माझ्या मनात...फक्त शरीराने दुर.... पण तीने मला दुर केलं....कसं? अहो कसं काय म्हणता? प्रेमातला दुसरा विषय विसरलात?.... अहो भुमिती....या विषयात लहान मोठ्या अंशाचे कोन असतात..... त्रिकोण असतात .....कधि कधि चौकोन असतात....आमच्या आयुष्यात कोणता कोन आला ते विचारु नका...छे हि भुमिती फारच अवघड..मला तर काही कळत नाही यातल...पण एक सांगतो; तुमच्या आयुष्याचा कोणताही कोन होऊ देत पण काटकोन त्रिकोण होऊ देउ नका..कारण या भुमितीत पायथागोरस काही कामाचा नाही.
हे गणित आणि भुमिती सोडवणं आम्हाला काही जमलं नाही. म्हणुन आम्ही अडाणी ते illitrate का काय ते....खर तर या प्रेमाच्या प्रवाहात फक्त वाहत गेलो......कधितरी किनारा सापडेल म्हणुन लाटांचे फटके हसत सहन करत गेलो....उगवत्या नारायणाला नमस्कार तर मावळत्या दिवसाला धन्यवाद म्हणत गेलो....रात्रीच्या चंद्राला तीच्या गुजगोष्टी सांगत राहीलो...ती सुखी आहे अस म्हणत मीही हसत राहीलो....आज कळल प्रेमाच्या विषयात मी अडाणीच राहीलो..
हे परमेश्वरा; तिचे आयुष्य सुंदर फुलांनी उमलु देत.....तिच्या वाटेवरती प्राजक्ताचे सडे पडू देत.....तिचे सगळे दुःख मला दे माझे सारे सुख तिला दे.......
हे सखे;
माझे हे आयुष्य तु सोडवलेल्या गणिताला .....तु जोडलेल्या त्या भुमितीला अर्पण .....
तु सुखी रहा मी सुखी आहेच!

Friday, June 12, 2015

प्रेम : संवेदना या भावनाओं की आवश्यकता

आज एकदम से जब प्रेम के बारे मैं बात कर रहे थे तो एहसास हुआ कि आज प्रेम सिर्फ एक संवेदना नहीं बल्कि एक प्रकार से भावनाओं की आवश्यकता बन ति दिखाई दे रही हैं। कुछ साल पहले इसी विषय पर चर्चा करते समय कुछ लोगों का कहना था की यह एक आकर्षण है और इसमें हमेशा धोखा दिया जाता हैं। 

प्रेम या प्यार पर कभी भी खुलकर बात नहीं होती। मगर इस विषय पर आधारित अधिकतर आधुनिक हिंदी मराठी धारावाहिक हर घर में हर दिन पूरे परिवार के साथ मिलकर देखी जाती हैं। हमारे इस समाज ने इन धारावाहिक के किरदारों को स्वीकार कर इन्हें अपने घरों में ओर दिलों में जगह दी है लेकिन अपने ही परिवार के सदस्य जो प्रेम के इस भवर में फसे हैं उन्हें अपने जीवन से ही बेदखल कर दिया है।


प्रेम के इस चक्रव्यूह फसे युवा पीढ़ी भी कई बार अति संवेदशिल होती दिखाई पड़ती है। ऐसा क्यों हो रहा है? प्रेम अगर एक भावना है तो इसे समझना होगा और स्वीकार करना होगा। 
प्रेम का संबध उम्र से करना चाहिए? क्योंकि हमने युवा काल को यह कहते हुए बदनाम किया है कि "सोला बरस की बालि उमरिया" या फिर मराठी में "सोलाव वरिस धोक्याच ग बाईं धोक्याच"। 
अपनी जिंदगी के अंत में भी लोगों को किसी अपने की तलाश रहती है। उन्हें भी खुलकर अपने प्यार का इजहार करना होता है लेकिन समाज इसे मान्यता नहीं देता।
कल ही एक दोस्त ने कहा "यह उम्र ही ऐसी है कि किसी का सहारा तो चाहिए। कोई तो हो जिससे सारी बातें कर सकें।कोई तो हो जिससे थोड़ी शरारत कर सके।" मुझे लगता हे की उसे उम्र की जगह वक्त कहना चाहिए था। क्योंकि हर किसी के जीवन में ऐसा वक्त आता है कि हम भरी मैफिल मे अकेला महसूस करते है। हमें कोई अपना दर्द समझने वाला व्यक्ति पास चाहिए होता है।
यही बात मुझे दोराहे पर खड़ी कर पूछती है कि क्या प्रेम एक एहसास , संवेदना या फिर जरूरत है भावनाओं को सहलाने की?
इन्हीं प्रश्नों का उत्तर तलाशने की कोशिश कर रहा हूँ मेरी पहली कहानी में -------
"प्राजक्ता- प्यार का एक अधूरा एहसास"
                                                                                                                                        ---- अल्केश अहिरे

बिन प्रेताची अंत्ययात्रा...

आठवणींच्या सावलीत सजवलेली तिरडी आप्तस्वकीयांच्या खांद्याचा भार होऊन अखेरची शोभायात्रा निघाली... एका कोपऱ्यात बसून मी ही अनुभवली बिन दे...