Thursday, February 14, 2019

बिन प्रेताची अंत्ययात्रा...

आठवणींच्या सावलीत सजवलेली तिरडी
आप्तस्वकीयांच्या खांद्याचा भार होऊन
अखेरची शोभायात्रा निघाली...
एका कोपऱ्यात बसून मी ही अनुभवली
बिन देहाची अंत्ययात्रा...
निजलेल्या जाणिवांचा जागर होताना पाहिला
नसलेल्या प्रेमाचा सागर होताना पाहीला
रडणाऱ्यांचे खोटे अश्रू बघून आत्मा ही जळतांना पाहीला
बिन देहाच्या या अंत्ययात्रेत अहंकार विकतांना पाहिला
सरतेशेवटी चीते वरती पुतळा जळताना पाहीला...
बिन देहाच्या या अंत्ययात्रेला आत्मा दुःखी होताना पाहीला

©अल्केश अहिरे 🦂

No comments:

Post a Comment

बिन प्रेताची अंत्ययात्रा...

आठवणींच्या सावलीत सजवलेली तिरडी आप्तस्वकीयांच्या खांद्याचा भार होऊन अखेरची शोभायात्रा निघाली... एका कोपऱ्यात बसून मी ही अनुभवली बिन दे...