संवाद आणि संभाषण यात फरक
नक्कीच असतो. मला संभाषण नाही करायचं, संवाद साधायचा आहे, माझ्यातल्या मीचा तुझ्यातला मी शी.
काय आहे ना … आपल्यात होणाऱ्या संभषणामूळे आपल्यातला संवाद हरवत
चालला आहे.
आता माझ्यातल्या मी कोण? तर
हा माझ्यातला मी म्हणजे 'मी जसा आहे तसा', जो अव्यक्त आहे, दुसऱ्याच्या शरिरातील आत्मा असल्या सारखा वावरणारा, स्वत:च अस्तित्व हरवुन बसलेला. आणि तुझ्यातला मी कोण? तर ह्या माझ्यातल्या मी चा
थांगपत्ताही माहीत नसलेला, जगाला दिसतो म्हणून
अस्तित्व असलेला, अपेक्षांचं ओझं वाहणारा, आणि श्र्वास चालू आहे म्हणून जगणारा.
बराच गोंधळ उडाला असेल नाही?
पण काय आहे ना, असे बरेच “मी” आपल्या भोवती
असतात, तुझ्यातल्या मीला ते जाणवतही नसतील.
तर मला आज संवाद साधायचा
आहे तुझ्याशी, तुझ्यातल्या मी शी. सांगून टाकायचे आहे की नाही जमणार हे द्वंद्व, थकलोय आणि हरलोय हा मुखवटा घालून. आता जगायचंय जसा आहे तसंच. तु म्हणशील म्हणजे नक्की काय करायचंय? सांगतो ऐक…
काल एक वाक्य ऐकलं… “This generations living
only engineered and technical relationship. They don’t think beyond physical
needs, either bodily or materialistic. They forgot emotional needs of
relationship. In fact, they diverted their emotions towards physical needs and
bonded it tightly so there is no escape”
कळलं? ही आजची पिढी फक्त व्याव्हारिक
संबंधांवर जगतेय. त्यात भावनांना जागाच नाही. माझी इथेच घुसमट होते आहे म्हणून माझ्यातल्या अव्यक्त
मी आज व्यक्त होतोय. तुझ्यातल्या मी कडून अश्याच
होणाऱ्या अपेक्षा मला जिवंतपणी मरण यातना देतात. तुझ्यातल्या मी च्या दार्शनिक सुखासाठी माझ्यातल्या मी अनेकदा दुखावलेला
असतो हे तुझ्या लक्षात येतही नाही.
खरं तर चुक तुझी ही नाही. स्वत:ला काय हवं हे समजून
घेतल्याशिवाय दुसऱ्याला देण्याची घाई केली की हे असं होतं.
संवाद सुरू केलाय… पुन्हा येईल… कारण तुझ्यातल्या
मी शी युती करून माझ्यातल्या मी ला आयुष्याचं हे राज्य सुखाने चालवायचं आहे.
तुझ्यातल्या मी – माझ्यातल्या मी
फक्त तुझाच मी…
No comments:
Post a Comment